जर तुमचे बँक खाते असेल तर तुम्ही त्यात तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवावा. काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
Mobile Banking Information – मोबाईल फोनशिवाय तुम्ही बँकेशी संबंधित अनेक गोष्टी करू शकत नाही. तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही मोबाईल बँकिंग, ऑनलाईन पेमेंट्स, UPI, मनी ट्रान्सफर सारख्या गोष्टी करू शकता. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता जवळपास सर्वच बँकांनी मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडणे अनिवार्य केले आहे.
बँक खात्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांक हरवला असेल किंवा कोणत्याही कारणास्तव तो तुम्ही सहज बदलू शकता. आतापर्यंत तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागत होते, पण आता हे काम तुम्ही घरी बसून करू शकता. ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधूनही तुम्ही मोबाइल नंबर बदलू शकता.
ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आणि व्यवहार सुधारण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की बँकेशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे. आरबीआयने ई-मेल आयडीही अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. आता रिप्लाय पर्याय ई-मेलमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही थेट फसवणुकीची तक्रार करू शकता. तर यापूर्वी बँकेकडून येणाऱ्या ईमेलमध्ये उत्तर देण्याचा पर्याय दिला जात नव्हता.
Mobile Banking In Marathi – जर तुम्हाला ऑनलाइन व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. ज्यांनी त्यांचे बँक खाते त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक केलेले नाही, त्यांना यापुढे ऑनलाइन बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार नाही.
आरबीआयने म्हटले आहे की, जर तुम्ही 3 दिवसांच्या आत बँकेला फसवणुकीची तक्रार केली तर 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे खात्यात परत केले जातील. तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर आता तुम्ही घरबसल्या सहजपणे बदलू शकता. आजकाल बहुतांश बँका ही सुविधा ऑनलाइन देतात. तुम्ही तुमच्या खात्यात ऑनलाइन लॉग इन करून हे बदलू शकता.
तुमचे खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधूनही तुम्ही तुमचा मोबाइल नंबर बदलू शकता. तुम्ही बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमच्या खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
Thank You,