हजारो लाखो रुपये कमवायचे असतील तर हे व्यवसाय चालू करा गणेश उत्सवपर्यंत लाखोंचे मालक व्हाल

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Business Ideas In Marathi – मित्रांनो, आमच्या वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे, आज आम्ही तुम्हाला गणेश चतुर्थीला कोणता व्यवसाय करू शकता हे सांगणार आहोत. भारतात अनेक सण साजरे केले जातात आणि त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी त्यापैकी एक आहे आणि गणेश उत्सव महाराष्ट्रात जोरात आणि धूम धडाक्यात साजरा केला जातो.

गणेश उत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि देश बाहेर साजरा केला जातो, आणि गणेश उत्सवात तुम्ही हजारोंची आणि लाखो रुपयांची कमाई कशी करू शकतात ही सर्व माहिती तुम्हला याच्या या लेखात देणार आहोत, म्हणून ही पोस्ट शेवट्पर्यंत वाचा.

Festival Business Ideas In Marathi –

मित्रांनो तुम्हाला आज या पोस्ट मध्ये आम्ही अशे काही व्यवसाय सांगणार आहोत, हे व्यवसाय आता चालू करून तुम्ही गणेश उत्सव पर्यंत लाखोंची कमाई करू शकतात, आणि हे व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील, म्हणून विलंब न करताच काय आहेत व्यवसाय जाणून घेऊ.

मूर्ती विकून पैसे कमवा –

मित्रांनो जर तुम्हाला मूर्ती बनवण्याची कला अवगत असेल तर तुम्ही गणपतीची मूर्ती बनवून विकू शकतात, किंवा तुम्ही होलसेल बाजारातून किंवा कमी भावात मूर्ती कारखान्यातून मूर्ती घेऊन स्टॉल लावून मूर्ती विकण्याचा व्यवसाय चालू करू शकतात, अगदी कमाई पैशात तुम्ही हा व्यवसाय चालू करून जास्त पैसे कमावू शकतात. तुम्हाला बाजारात मूर्तींचे भाव माहिती असेल कि मूर्ती कितीला विकली जाते, त्यामुळे तुम्ही तुमच्या कमाईचा अंदाज बांधू शकतात.

गणपतीचे वस्त्र किंवा पूजेचा सामान विकून पैसे कमवा –

मित्रांनो, जेव्हा गणपती आपल्या घरी येतो तेव्हा आपण त्याला तयार करण्यासाठी बाहेरून कपडे विकत घेतो, त्याचे कपडे तुम्ही स्वतः बनवून बाहेर विकले तर त्यातून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात, तुम्हाला होलसेल बाजारात कमी भावात असे वस्त्र मिळतील जे तुम्ही विकून चांगले पैसे कमावू शकतात, यात तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही, याच बरोबर तुम्ही पूजेला लागणारे सामान देखील विकू शकतात.

या व्यवसायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पुजेचे साहित्य होलसेलमध्ये खरेदी केले नाही तर तुम्हाला फारसा नफा मिळू शकणार नाही. त्यामुळे वस्तू खरेदी करण्यापूर्वी कोणत्या दुकानातून किंवा शहरात होलसेलमध्ये माल उपलब्ध आहे हे ठरवावे लागेल.

पूजेला लागणारे सामान –

  • कापूर,
  • अगरबत्ती,
  • धूप,
  • नारळ, कापूस,
  • लाल कापड,
  • सिंदूर,
  • हळद, सुपारी,
  • पवित्र धागा,
  • काळा तीळ,
  • देवाचे फोटो – मुर्ती, दिवा, चुनरी,
  • धार्मिक पुस्तक,
  • पूजा भांडी,
  • फुलांचा हार
  • लक्ष्मीचे पाय
  • झालर
  • सजावटीचे दिवे,
  • मेणबत्ती

येथे बघा – दिवाळीत या 14 व्यवसायातून वर्षभर कमवा

सजावटीच्या वस्तूंचा व्यवसाय करा –

आम्‍ही तुम्‍हाला सांगितल्‍याप्रमाणे झालर, तोरण, बांधनबार, दिवे, लाइटिंग इत्‍यादी सजावटीच्‍या सामानाची खरेदी करून तुम्ही विविध प्रकारच्‍या वस्तू बनवू शकता. या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता. काय बनवायचे आणि कसे बनवायचे याचे लाखो पर्याय तुम्हाला इंटरनेटवर सापडतील. त्यातून तुम्ही वस्तू बनवू शकता आणि नंतर बाजारात विकू शकता.

सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता असेल. जसे जरी, मोती, स्टोन, कुंदन, गोंद, डिंक, विविध रंगीत कागद, तारा, कपडे इत्यादी आणि तत्सम अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत ज्या तुम्ही खरेदी करून विविध वस्तू बनवू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला बाजारात सहज मिळतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या सर्व गोष्टी घरबसल्या ऑनलाइन वेबसाइटद्वारे ऑर्डर करू शकता. तुम्ही सजावटीच्या बनवलेल्या वस्तू भाड्याने देखील देऊ शकतात.

मोदक बनवण्याचा व्यवसाय करा –

गणेश उत्सव आला म्हणजेच मोदक देखील आलाच, प्रत्येक घरात मोदक हे श्री गणेशाला प्रसाद म्हणून दाखवला जातोच, आणि लोक गणेश उत्सवात पूजा ठेवतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात मोदकाची मागणी असते.
जर तुम्ही मोद्क बनवण्यात एक्स्पर्ट असणार तर तुम्ही मोदक बनवणून विकू शकतात
तुम्ही या प्रकारचे मोदक बनवून विकू शकतात – उकडीचे मोदक, खव्याचे मोदक, साधे मोदक, चॉकलेट मोदक किंवा लाडू, तुम्ही ऑर्डर नुसार हे पदार्थ बनवणून विकून खूप चांगले पैसे कमवू शकतात, तुम्ही घरी बसूनच हा व्यवसाय चालू करू शकतात

Conclusion – गणेश उत्सवात व्यवसाय करून पैसे कसे कमवायचे

मित्रानो आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला गणेश उत्सवात कोणते व्यवसाय केले जातात आणि कोणते व्यवसाय चालू करून तुम्ही पैसे कमावू शकतात या संबंधित माहिती दिलेली आहे . वरील दिलेल्या सर्व व्यवसाय तुम्ही एकत्र देखील सुरु करू शकतात, जर तुमच्या कडे पैसे गुंतवण्यासाठी असतील तर वरील व्यवसाय तुम्ही सोबत चालू करू शकतात. मित्रानो तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे कळवा धन्यवाद.

NOTICE – This post is copyrighted, no one should copy the post otherwise action will be taken.

Thank You,

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा