टॉप १० व्यवसाय कल्पना मराठी मध्ये | Part time business ideas in Marathi 2025
मित्रांनो आजकाल प्रत्येक जण आपल्या रेगुलर फुल टाईम जॉब सोबत Passive Income साठी पार्ट टाइम जॉब किंवा बिझनेस आयडिया च्या शोधात असतात, जेणेकरून ते करत असलेल्या कामासोबत किंवा त्यांना जेव्हा जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा त्यांच्या कडे असलेल्या फावल्या वेळामध्ये थोडे पैसे कमवू शकतात, आणि त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी आजच्या या लेखामध्ये घेऊन आलो आहे TOP 10 Part time business ideas in Marathi.
Part time business ची सर्वात पहिली आयडिया म्हणजे,
1. यूट्यूब चैनल
जसे की तुम्हाला माहितीच असेल यूट्यूब हा प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी बनलेला आहे यूट्यूब वर लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी काही ना काही बघायला भेटतच. यूट्यूब वर तुम्ही सर्व प्रकारच्या videos upload करू शकता, जसं की एखादी हाउसवाइफ नवीन नवीन डिशेस बनवून त्यांची रेकॉर्डिंग करून व्हिडिओज यूट्यूब वर अपलोड करते, किंवा एखादा तरुण मुलगा आपल्या जनरेशन साठी व्हिडिओज यूट्यूब वर अपलोड करू शकतो, मग त्यात तो इतरांना गिटार वाजवायला शिकू शकतो किंवा डान्स करायला शिकवू शकतो किंवा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करू शकतो, त्यामुळे जर तुम्हालाही जॉब व्यतिरिक्त थोडा वेळ भेटत असेल आणि तुमच्याकडे एखादा स्किल असेल आणि त्या स्किल मध्ये तुम्हाला तुमचं नाव करायचं असेल तर त्या स्किल रिलेटेड तुम्ही व्हिडिओज यूट्यूब वर अपलोड करा, आणि यूट्यूब वर येणाऱ्या एड्स आणि स्पॉन्सरशिप मधून तुम्ही लाखो मध्ये घरी बसून पैसे कमवू शकता.
2. ट्यूशन क्लासेज बिजनेस
ट्युशन क्लासेस देखील पार्ट टाइम घेऊन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल, तर रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही स्कूल मधील विद्यार्थ्यांना शिकवू शकता, किंवा जर तुम्ही जॉब करत असाल तर नक्कीच तुमच्याकडे त्या जॉब रिलेटेड स्किल तर असेलच, त्यामुळे तुम्ही जॉब करत करत पार्ट टाइम ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा ट्युशन क्लासेस घेऊ शकता.
3. एफिलिएट मार्केटिंग व्यवसाय
आजकालच्या डिजिटल दुनियेमध्ये ऑनलाइन मार्केटिंग एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि याच ऑनलाइन मार्केटिंगचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे एफिलएट मार्केटिंग. एफिलएट मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांना एका कंपनीचे प्रोडक्ट ऑनलाइन दुसऱ्या व्यक्तींना विकायचा असतात, आणि ते प्रॉडक्ट विकल्यानंतर त्यांना त्या प्रॉडक्ट मागे कमिशन भेटते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही अमेझॉन एफिलएट जॉईन करू शकता, आणि तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही ब्युटी रिलेटेड एखादं प्रॉडक्ट इंस्टाग्राम किंवा यूट्यूब वर प्रमोट करू शकता आणि त्या प्रॉडक्ट ची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये द्यायचे आहे, तुमचे फॉलोवर्स जेव्हा ती व्हिडिओ बघून, तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करतील आणि तिथून तो प्रॉडक्ट विकत घेतील तेव्हा त्यामागे तुम्हाला पाच ते दहा टक्के कमिशन भेटतो.
4. Blogging
पार्ट टाइम बिझनेस आयडियाज मध्ये सगळ्यात माझ्या आवडीची बिझनेस आयडिया म्हणजे ब्लॉगिंग. मला लिखाणाची खूप आवड आहे आणि म्हणूनच मी thebusinessideasmarathi.com ही वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवर मी आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये लोकांना बिझनेस आयडिया सांगत असतो, आणि जर तुम्ही नीट नोटीस केला असाल तर माझ्या या वेबसाईटवर तुम्हाला एड्स दिसत असतील. तर या वेबसाईटवर येणाऱ्या एड्स मधून मला रेवेन्यू जनरेट होतो. यासाठी मला Google Adsense, या गुगल च्या वेबसाईट कडून सर्वात प्रथम वेबसाईटचं अप्रूवल घ्यावं लागलं. आणि हे अप्रूवल घेणं अतिशय सोपं असते, त्यामुळे जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल, तर तुम्ही तुमचा एखादा ब्लॉग सुरू करू शकता आणि त्यावर येणाऱ्या ॲड्स मधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
5. Short Video Editing
मित्रांनो आजकाल व्हिडिओ कन्टेन्ट खूप जास्त बघितला जातो, यामध्ये इंस्टाग्राम वर रिल्स आणि यूट्यूब वर Shorts videos बघायला सर्वांनाच आवडतात, त्यामुळे सध्या Short Video Editor ची खूप जास्त मागणी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शॉर्ट videos या जास्तीत जास्त 1 मिनिटाच्या असतात, त्यामुळे तुम्हाला Editing करायला जास्त वेळ जाणार नाही आणि सध्या मार्केट मध्ये 1 शॉर्ट video बनवण्याचे 300-500 रुपये सहज भेटून जातात त्यामुळे तुम्ही दिवसाला फक्त 5 videos जरी एखाद्याला edit करून दिल्यात तर तुम्हाला दिवसाला 2 हजार रुपये भेटू शकतात.
6. फ्रीलांसिंग बिजनेस
पुढची पार्ट टाइम बिझनेस आयडिया म्हणजे फ्रीलान्सिंग बिझनेस मित्रांनो माझ्या माहितीमध्ये माझे खूप सारे मित्र असे आहेत जे त्यांचा फुल टाईम जॉब सोडून आता पूर्णपणे फ्रीलान्सिंग बिझनेस मधून भरपूर नफा मिळवत आहेत. तुम्ही सुद्धा फ्रीलान्सिंग बिझनेस करायचा विचार करत असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही सुरुवातीला पार्ट टाइम फ्रीलान्सिंग बिझनेस सुरू करा एकदा का तुम्हाला भरपूर प्रोजेक्ट भेटायला लागले की तुम्ही तुमचा जॉब सोडून फुल टाईम फ्रीलान्सिंग करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या स्किल नुसार तुमची प्रोफाइल fiverr.com, freelancer.com, upwork.com. यांसारख्या वेबसाईटवर तयार करू शकता. यांसारख्या साइट्स वर जगभरातील भरपूर जण त्यांच्या कामासाठी फ्रीलान्सर शोधत असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा पार्ट टाइम बिझनेस आयडिया शोधत असाल तर फ्रीलान्सिंग बिझनेस तुमच्यासाठी योग्य आयडिया होऊ शकते.
7. सोशल मीडिया मैनेजर
सोशल मीडिया मॅनेजर एक असा व्यक्ती असतो जो बिझनेस मॅन किंवा एखाद्या entrepreneur ची डिजिटल प्रोफाइल व्यवस्थित राखण्यासाठी काम करत असतो. आजच्या या डिजिटल जमान्यामध्ये सोशल मीडिया प्रोफाइलचे महत्व किती असते ते तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे एखाद्या प्रॉडक्ट चा पेज किंवा एखाद्या व्यक्तीची प्रोफाइल मॅनेज करण्यासाठी खूप जण सोशल मीडिया मॅनेजर शोधत असतात. त्यामुळे तुमचा जॉब करत करत तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी सोशल मीडिया मॅनेजर म्हणून देखील काम करून पार्ट टाइम कामे करू शकता.
8. Dropshipping
मित्रांनो ड्रॉप शिपिंग एक असा बिझनेस मॉडेल आहे ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही इन्व्हेंटरी शिवाय ऑनलाइन जाऊन प्रॉडक्ट विकू शकता यामध्ये तुम्हाला कोणत्याही दुकान, शोरूम किंवा गोडाऊन ची गरज लागत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा पॅकिंग किंवा शिपिंग तुम्हाला करायची गरज लागत नाही. यामध्ये तुम्हाला करायचे एवढेच आहे की तुम्हाला एखाद्या प्रॉडक्ट संबंधित एक WEBSITE बनवायचे आहे आणि त्यावर एखाद्या सप्लायर्स चे प्रॉडक्ट तुम्हाला लिस्ट करायचे असतात, तसेच त्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर नीट डिटेल मध्ये टाकायची असते. जेव्हा एखादा युजर तुमच्या वेबसाईटवर येऊन तो प्रॉडक्ट विकत घेतो तेव्हा तुम्हाला फक्त करायचं एवढंच असतं की तुम्हाला सप्लायर ला त्यासंबंधी माहिती द्यायची असते सप्लायर प्रॉडक्ट ला पॅक करून युजरने दिलेल्या पत्त्यावर डिलिव्हरी करतो. आणि जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा त्यातील काही प्रॉफिट मधील पर्सेंटेज तुम्हाला सुद्धा मिळतो.
9. Form filing and data entry
मित्रांनो आज इंटरनेटवर खूप साऱ्या डेटा एन्ट्री संबंधी वेबसाईट्स आहेत ज्यावर तुम्हाला तुमच्या घरातच बसून लॅपटॉप वर किंवा तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुम्हाला दिलेले टास्क म्हणजे तुम्हाला दिलेले डेटा एंट्री करायचे असतात. त्यामुळे जर का तुम्ही गृहिणी असेल किंवा तुम्ही स्टूडेंट असाल तर तुमच्यासाठी डेटा एन्ट्री टाईप बिझनेस आयडिया देखील खूप चांगला नफा मिळवून देऊ शकतो.
10. Baking Business
जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला केक बनवण्याची आवड असेल, तर केक बेकिंग बिझनेस तुमच्यासाठी खूप चांगला नफा मिळवून देऊ शकतो. यासाठी तुम्हाला करायचे एवढेच आहे की तुम्हाला तुमच्या केक शॉप संबंधी एक छानसे इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज बनवायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व माणसांना तुम्ही बर्थडे किंवा एनिवर्सरी साठी केक बनवून देता, यासंबंधी माहिती देऊन ठेवा, आणि तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन केक बनवाल त्याचे फोटोज आणि व्हिडिओज बनवून इंस्टाग्राम वर अपलोड करा सोबत तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तिथे टाका पहा तुम्हाला थोड्याच दिवसात रेग्युलर केक बनवून देण्याच्या ऑर्डर्स घ्यायला लागतील.
तर मित्रांनो आजपासून च या १० Part time business ideas in Marathi मधील एक तुमच्या आवडीची आणि तुमच्या स्किल नुसार business idea निवडा आणि जॉब करत करत Part Time business करायला सुरवात करा. आणि काही अडचण आली तर मी आहेच, तुम्ही मला कंमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता.
Also Read