Business Ideas In Marathi – मला वाटते की प्रत्येक दक्षिण भारतीयाकडे स्वतःहून अप्रतिम इडली आणि डोसा बनवण्याची प्रतिभा आहे आणि त्यांच्याकडे इडली आणि डोसा व्यवसायाच्या कल्पना असतील. आणि जग हेल्थ कॉन्शस झाल्यामुळे संपूर्ण ब्रेकफास्ट ट्रेंड बंद होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चांगले जुने डोसे आणि वाफवलेली इडली हे आरोग्याविषयी जागरूक असलेल्या या नव्या युगात उत्तम प्रकारे बसते. बरं, तुम्ही दक्षिण भारतीय नसलात, पण इडली-डोसा कसा बनवायचा हे माहीत असलं, तरी तुम्ही चांगला व्यवसाय म्हणून काही विक्री सुरू करू शकता.
हा व्यवसाय कमी गुंतवणुकीवर आणि दिवसाला जास्त पैसे कमवून देणारा आहे. आज अनेक लोक हा व्यवसाय सकाळी चालू करून दिवसाला ४ ते ५ हजार कमावत आहेत, परंतु हा व्यवसाय दक्षिण भारतीय जास्त करत आहेत आता तुम्ही सुद्धा हा व्यवसाय खूप कमी खर्चात चालू करू शकतात, फक्त सकाळी ७ ते १२ हा व्यवसाय करून तुम्ही नंतर इतर कामे करू शकणार. चला तर जाणून घेऊया या व्यवसायातून दिवसाला ३ ते ४ हजार कसे कमवायचे.
इडली आणि डोसा व्यवसाय का सुरू करावा –
मित्रानो आज काल प्रत्येक जण घाईत असतो, सगळ्यांना सकाळी नाश्ता बनवायला वेळ नसल्या कारणाने बरेच लोक बाहेर नाश्ता करतात आणि काही आवडी साठी बाहेर नाश्ता करतात, त्यात इडली डोसा हा व्यवसाय जास्त उत्तम आहे , कारण लोकांना आता तेलगट पदार्थ खायला आवडत नाही किंवा हेल्थ साठी लोक तेलगट पदार्थ टाळतात, त्या मुळे इडली डोसा या पदार्थांची मागणी वाढली आहे. तुम्ही जर मार्केट मध्ये एकदा या व्यवसायासंबंधित जर सर्वे केला तर तुम्हाला लक्षात येईल कि इतर व्यवसायिक या व्यवसायातून दिवसाला ५ ते ८ हजार सहज कमवतात, म्हणून तुम्ही फक्त सकाळी ७ ते १२ या वेळात हा व्यवसाय चालू करून ३ ते ४ हजार कमवू शकतात.
येथे वाचा – 2 लाखापर्यंत सुरू हे होणारे 6 व्यवसाय बघा, चांगली कमाई करून देणारे व्यवसाय
हा व्यवसाय कसा चालू करू शकतात –
इडली,डोसा व्यवसाय चालू करण्यासाठी प्रथम तुम्हाला अशी जागा निवडावी लागेल जिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची खूप गर्दी असेल, आणि अशी जागा बघा जिथून लोक सकाळी कामाला जातात अशी चांगली जागा बघा, तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी एक स्टॉल लागेल, जिथे तुम्हाला इडली बनवणारे भांडे, एक शेगडी, तवा, इत्यादी गोष्टि लागतील, किंवा तुम्ही घरीच बनवून देखील स्टॉल लावला तरी चालेल, तुम्ही तुमच्या स्टॉल वर इडली, डोसा, वडा, उत्तपा इत्यादी गोष्टी ठेऊ शकतात.
येथे बघा – घरात बसून महिला करू शकतात मेहंदी कोन बनवण्याचा व्यवसाय, याप्रमाणे सुरू करा
कमाई किती होईल –
इडली, डोसा व्यवसायातून तुम्ही दिवसाला ४ ते ५ हजार कमावू शकतात, कारण सध्या हा व्यवसाय खूप चालतो आहे, तुम्ही इडली प्लेट २० रुपये ते ३० रुपयाने विकू शकतात, म्हणजेच तुम्ही दिवसाला ५० प्लेट इडली आणि ५० प्लेट डोसा किंवा वडा विकला तर तुमची कमाई ३ हजार पर्यंत सहज होते, फक्त तुम्ही तुमची लाज सोडून हा व्यवसाय चालूं करावा, एकदा कि हा व्यवसाय चालू झाला, तुम्ही हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणावर घेऊन जाणार हे निश्चित.
या व्यवसायात खर्च किती येईल-
इडली, डोसा व्यवसाय चालू करण्यासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही हा व्यवसाय तुम्ही १० हजाराच्या आत सहज चालू करू शकतात, जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू करायचा असेल तर तुम्हाला १ ते २ लाख रुपये गुंतवावे लागतील.
बघा – बिस्कीट बनवण्याचा व्यवसाय कसा करावा
Thank You,